Sunday, 12 January 2025

TPM च्या गोष्टी २ - यामागूची सॅन

आज थोडस यामागुची सॅन बद्दल.
Suo Yamaguchi san हे JIPM चे TPM consultant होत. भारतामध्ये TPM CLUB OF INDIA ही संस्था उभारण्यात CII आणि जपान ची JIPM म्हणजे जपान इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट मेंटेनन्स या दोन संस्थांचा पुढाकार होता.१९९१ मध्ये ही संस्था सुरू झाली आणि त्यानंतर सुरवातीच्या काळात भारतात आलेल्या जपानी TPM गुरू पैकी यामागूची हे एक होत.

अतिशय कडक शिस्तीचे YAMAGUCHI सॅन एखाद्या कारखान्याला भेट देणार अस ठरलं तर एक महिना आधीपासून तयारी सुरू व्हायची. ती थेट त्या भेटीच्या दिवशी पर्यंत चालायची. 
त्यासाठी रात्री ३ - ३.३० पर्यंत काम करून १-२ तासासाठी घरी जाऊन परत ५.३० वाजता सर्वच जन कारखान्यांमध्ये हजार व्हायचे.
TPM COORDINATOR म्हणून कार्य करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५ वर्ष काम करायला मिळाले.
भारतीयांच्या 'चलता है!' या ATITUDE बद्दल त्यांनी प्रत्येकच ट्रेनिंग सेशन अथवा कारखान्यांच्या भेटी दरम्यान चांगलेच कोरडे ओढले.
स्वच्छता, ५S यावर खूपच जास्त कटाक्ष असे.
त्यांचे काही वाक्य हे अगदी फ्रेम करून लावावेत ( आणि आम्ही लावले पण) आणि आत्मसात करावेत असे होत
उदा. GOOD OBSERVATION GOOD ANALYSIS

भारतीय व्यवस्थापकांवर त्यांचा चांगलाच कटाक्ष असे. "MANAGER DAMAGER" हे असेच एक त्यांचे आवडते वाक्य.

त्यांची भेट ठरलेली असली तर काही जण चक्क दांडी मारत 🏃🏻‍➡️.

भारता मध्ये TPM प्रणाली रुजविण्यात त्यांचा चांगलाच वाटा आहे

माझ्या सारखे असंख्य TPM PROFESSIONAL त्यांच्यामुळे घडले त्यासोबतच वरिष्ठ पातळीवर TPM, ५S, त्यासोबतच झीरो ब्रेकडाऊन, झीरो एक्सीडेंट आणि झीरो डिफेक्ट शक्य आहेत हा विश्वास रुजला.

२००४ ते २००९ दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच ऑटोमोटिव कंपन्या तसेच त्यांचे पुरवठादार यांच्याकडे त्यांनी भेटी दिल्या तसेच प्रशिक्षण वर्ग मुख्यतः बजाज ऑटो च्या माध्यमातून चालवले.

त्यावेळेस तिथे उपस्थित असणारी बरीच मोठी अभियंत्यांची फळी आता TPM consultant झालेली आहे 😊 

#नोंद
#TPM 
#Excellence 

ताजा कलम - ते आता निवृत्त झाले आहेत आणि टोकियो येथे राहतात.
मागच्या मार्च मध्ये TPM अवॉर्ड साठी जपान ला गेलेलो असताना भेटीची इच्छा होती पण नाही जमले.

सॅन म्हणजे जापनीज भाषेत सन्माननीय

सचिन काळे ©️

1 comment:

Anonymous said...

खूप छान, San सरांची माहिती दिली.