एकदा काय झालं एक मेंटेनन्स विभाग अधिकारी कंपनी सोडून दुसरीकडे गेला.
त्या रिक्त जागेवर शोधूनही योग्य उमेदवार बरेच दिवस मिळाला नाही.
त्यादरम्यान त्या अधिकाऱ्याचा एक दुय्यम सहकारी त्याला आपण अ म्हणू. तर अ तो विभाग बघू लागला. मग अस ठरलं की त्यालाच ती जबाबदारी द्यायची. लगेचच त्याला पदोन्नती देखील देण्यात आली.
त्यानेही जोमाने काम सुरू केले. आता प्रश्न उभा राहिला की त्याच्या पूर्वीच्या जागेवर एक योग्य उमेदवार शोधणे.
तिथेही थोडा वेळ लागला.
दरम्यान अ हा त्याचा कार्यभार तसेच वाढलेला कार्यभार बघू लागला. तो तांत्रिक बाबीत हुशार होताच पण विभागप्रमुख चा कार्यभार म्हणजे admin प्रशासकीय गोष्टी सांभाळून बेजार झालेला. त्याचा परिणाम त्या विभागाच्या परफॉर्मन्स वर तसेच कंपनीच्या उत्पादनावर होऊ लागला.
शेवटी या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अ ला पुन्हा एकदा त्याच्या पूर्वीच्याच जागेवर बसवण्यात आले आणि विभागप्रमुख म्हणून नवीन व्यक्तीची नेमणूक करण्यात आली.
अ हा तांत्रिक ज्ञान कौशल्य यामध्ये हुशार पण admin मध्ये त्याचे कौशल्य विकसित करणे गरजेचे होते.
वरील परिस्थिती मधे कंपनी चे दोन जागी नुकसान होत होते. एक तर कुशल दुय्यम अधिकारी कमी झाला आणि ज्याला वर घेतले तिथेही अडचणी सुरू झाल्या.
त्यानंतर व्यवस्थापनाने धडा घेऊन तिथे प्रत्येक विभाग प्रमुखा मागे एक बॅक अप शोधला आणि दुसरी फळी विकसित करणे सुरू केले.
काही चांगल्या आस्थापनांमध्ये काही मोक्याच्या जागांसाठी एक अथवा दोन लोक तयार बॅक अप म्हणून केले जातात.
तांत्रिक असो अथवा प्रशासकीय दोन्हीही कौशल्ये तितकीच महत्त्वाची आहेत.
सचिन काळे ©️
No comments:
Post a Comment