नोकरीला लागून एक वर्ष झाल होत. इंजिनीअरिंग ला केलेला अभ्यास आणि आता प्रत्यक्ष करत असलेले काम आता कुठे समजू लागले.
अशात एकदा कंपनीच्या मुख्यालयात एक मीटिंग बोलावण्यात आली. आमचे प्लांट हेड आणि मी त्या मीटिंग साठी गेलो. मोठ्या ट्रेनिंग सेंटर मध्ये मीटिंग होती.
सर्वत्र खूप स्वच्छता आणि भरपूर प्रकाश. 60 च्या वर बसण्यासाठी खुर्च्या, समोर थोडासा उंच चौकोनी व्यासपीठ त्यावर टेबल आणि चार खुर्ची, त्याच्याच बाजूला प्रोजेक्टरच्या वर आमच्या कंपनीचा लोगो प्रदर्शित झालेला.
एक IT चा कर्मचारी शेवटची तयारी जसे की laptop, प्रोजेक्टर जोडणी, साऊंड सिस्टीम, स्लाईड बदल इत्यादी चेक करत होता.
आम्ही १५ मिनिट आधी पोहचलो आणि सर्वात आधी आलो. सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. दारातून आत जाताना आमचे सर पुढे आणि मी दोन पाऊल मागे असे आत आलो. प्लांट हेड सर सरळ जाऊन पहिल्या रांगेतील खुर्चीत बसले. मी त्यांच्या मागे जात तिसऱ्या रांगेतील एका खुर्चीत बसलो. (कॉलेज मधील मागच्या बेंचवर बसायची सवय अजून मोडायची होती😀) मी बसल्यावर सरांनी वळून मी कुठे बसलोय हे पाहिलं आणि मला आवाज दिला. अरे सचिन समोर ये. इथ बाजूला बस. मी समोरच्या रांगेत येऊन त्यांच्या बाजूच्या एक खुर्चीवर बसलो. मी तिथे बसल्यावर सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेऊन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला सांगितली " हे बघ तू कुठे बसावं हे तुला कधीच कुणीच सांगणार नाही. त्यामुळे नेहमी समोरच्या रांगेत बस. आणि वेळेआधी ५ मिनिट येऊन बस."
इतके मोकळेपणाने महत्त्वाचे धडे देणारे वरिष्ठ मिळणे हे दुर्मिळच.
सचिन काळे ©️
No comments:
Post a Comment