Saturday, 11 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी १६

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी १६

ऑईल गळती.

तर त्याच अस झाल की एकाच वेळेस बऱ्याच अडचणी प्लांट मध्ये सुरू झाल्या. म्हणजे कटिंग टूल्स तुटू लागले त्याने टूल कॉस्ट वाढली. तुटलेल्या टूल मूळे पार्ट ची गुणवत्ता खराब झाली त्यामुळे गुणवत्तेची कॉस्ट पण वाढली.

त्यातच काही कामगारांनी हाताला खाज येत असल्याची तक्रार केली. तसेच कुलंट चा वास येत असल्याची ही.
कुलन्ट कुठल्याही मशीन शॉप मध्ये अतिशय महत्त्वाचं रोल प्ले करतो. पार्ट कापल्या जात असताना कटिंग टूल आणि पार्ट यामध्ये जी उष्णता निर्माण होते त्यातला बराचसा भाग कुलन्ट स्वतः सोबत वाहून नेतो. कटिंग प्रोसेस चालू असताना ज्या चिप्स आणि bur निघतात त्यांना पण वाहून नेण्याचे काम हाच कुलन्ट करत असतो. 
पांढऱ्या रंगाचे दिसणारे कुलन्ट हे पाण्यात मिसळणारे ऑइल आणि पाणी यापासून बनलेले असते.

 त्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात त्यामुळे पाण्यात मिसळल्यानंतर आणि वापरत असताना त्याचा वास येत नाही. जर काही कारणांमुळे हे बॅक्टेरिया मेले तर मात्र दुर्गंध सुटायला सुरुवात होते आणि कुलन्टची गुणवत्ता खराब होते आणि मग वर सांगितलेले सर्व अडचणी यायला सुरुवात होते.

आता एकदा मूळ कारण कुलन्ट आहे हे निश्चित झाल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं ते शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली.
त्यानंतर मुख्य टॅंक मधील कुलन्ट चे परीक्षण केल्यानंतर आढळलं की त्यामध्ये हायड्रोलिक ऑइल उपस्थित आहे आणि त्याचे प्रमाण खूप जास्त झालेले आहे. खरतर हायड्रोलिक ऑइल हे त्यात नसायला हवे. हायड्रोलिक ऑइल चा वापर हा मशीन मध्ये पार्ट फीक्चर वर लॉक आणि अनलॉक करण्यासाठी वापरला जाते. हायड्रोलिक पावरपॅक च्या प्रेशर द्वारे ते कार्य केले जाते. 
आता हे हायड्रोलिक ऑइल तिथे कसं पोहोचलं याचा शोध सुरू झाला. सर्व मशीन तपासल्यानंतर चार मशीन अशा आढळल्या की ज्यामध्ये हायड्रोलिक ऑइल वाहून नेणारे पाईप हे कट झाले होते. आणि तिथून हायड्रोलिक ऑइल ची गळती सुरू होती जी शेवटी कुलन्ट मध्ये मिसळून मुख्य टॅंक मध्ये जाऊन पोहोचत होते.
एकदा कारण निश्चिती झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यात आली. गळके पाईप बदलण्यात आले.
त्यानंतर मुख्य कुलन्ट टँक मध्ये अधिकचे कुलन्ट टाकण्यात आले. 

आणि गाडी मूळ पदावर आली.

पुढे ही अडचण पुन्हा उद्भवू नये म्हणून टूल आणि फीक्चर विभागाने त्यांची तपासणी शीट अद्ययावत केली.

सचिन काळे ©️

No comments: