Saturday, 11 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी १३

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी १३

बदल

पूर्वी कारखान्यातील सर्वच काम वेगवेगळ्या विभागांमध्ये असलेल्या स्थायी कर्मचारी, कामगार यांच्याद्वारे केली जायची. कार्मिक विभाग नवीन लोकांना शोधून त्यांना कंपनी मध्ये सामील करायचा, त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा, पगार, भत्ते, इतर सुविधा अगदी कपडे, बूट साबण तेल, कॅन्टीन त्याचा हिशोब हे सर्व करतानाच कारखान्याची देखभाल जसे की इमारत, डागडुजी, रंग, स्वच्छता या सर्वच गोष्टी सांभाळत असायचा. यासोबतच मुख्यत्वे कामगार - व्यवस्थापन / मालक संबंध चांगले राहण्यासाठी मदत करायचा.

मागच्या दशकामध्ये यातील बरीचशी कामे ही अस्थायी अथवा सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थांना देण्यात आलेली आहेत. तुमच्या कामावर येण्याच्या आणि जाण्याच्या वेळा आता हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करून नोंदवायला लागत नाही. हजेरी हाताचे ठसे अथवा चेहरा याद्वारे स्कॅनर मशीन द्वारे थेट नोंदली जाते. तिथून थेट वेळ मोजणे आणि पगार यांचे काम दिले आहे त्यांच्या सिस्टीम मध्ये याची नोंद होते. 

टाईम किपर हा जॉबच कालबाह्य झाला आहे. रजिस्टर, रजेचे कार्ड बहुतांश ठिकाणी इतिहासजमा झालेले आहे. 
तिथेही मुख्यत्वे वेगवेगळे.ॲप्स अथवा संगणकावर प्रोग्राम बनवण्यात आलेले आहेत.कॅन्टीन अथवा चहा साठी देखील पूर्वी जे tickets मिळायचे त्या ऐवजी आता स्कॅनर मशिनद्वारे तुमची नोंद घेतली जाते.
Personnel Dept.चे रूपांतर HR म्हणजेच मनुष्य बळ विकास यामध्ये झाले.
नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने अनेक प्रकारचे काम सोपे झालेच पण त्यासाठीचे कर्मचारी देखील कमी झाले. जे या प्रक्रियेमध्ये स्वतःला बदलू शकले, नव्या कौशल्याचा विकास करू शकले तेच टिकले.
SURVIVAL OF FITTEST चा नियम सर्वच ठिकाणी लागू होतो.

बदल हीच एक कायम स्वरुपी प्रक्रिया आहे. त्यामुळेच त्यासाठी तय्यार असणे आणि नवीन ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे हा टिकून राहणे आणि पुढे जाणे याचा मंत्र आहे.

- सचिन काळे ©️

जुनी पोस्ट थोड्या बदलांसह.

No comments: