Monday 10 September 2018

वाहन उद्योग आणि रोजगार.

वाहन उद्योग आणि रोजगार.
एक दुचाकी अथवा चार चाकी कारखाना सुरू होतो तेव्हा अनेक छोटे मोठे रोजगार निर्माण होतात.
औद्योगिक शहर उभे रहाते.
फार दूर जायला नको औरंगाबाद जवळील वाळूज हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. बजाज इथे सुरू झाल्यानंतर कारखान्यात कामा साठी तांत्रिक कौशल्य असलेले मनुष्यबळाची गरज निर्माण तर झालीच पण त्यासोबतच विविध सुटे भाग पुरवठादार त्यांच्याकडे लागणारे कौशल्य आधारित मनुष्यबळ त्यासोबतच सेवा पुरविणारी एक व्यवस्था उभी राहिली.
आज वाळूज आणि परिसरात मुख्यत्वे बजाज चे पुरवठादार म्हणून सुरू झालेल्या अनेक कंपनी ह्या इतरही जागतिक स्तरावरील दुचाकी आणि चारचाकी कंपन्यांसाठी पुरवठादार म्हणून कार्य करत आहेत.
यामागे गुणवत्ता, वेळेवर पुरवठा आणि उत्कृष्ट प्रोसेस द्वारे उत्पादन या सर्वांचा तो एकत्रित परिणाम आहे.
या कंपनी मध्ये बहुतेक ठिकाणी उत्कृष्ट ते साठी टी पी एम प्रणालीचा अवलंब केलेला आहे. सुरवातीला बजाज च्या पुढाकाराने सुरू झालेला उत्कृष्ट तेचा प्रवास त्याची मिळणारी फळे पाहून पुढे सुरू राहिलाच आणि त्यासाठीचे अनेक पारितोषिकेही त्यांनी मिळवली, उदा जपान इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट मेंटेनन्स द्वारा देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या एक्सलंस टी पी एम अवॉर्ड. (थोड विषयांतर होतंय याविषयी सविस्तर नंतर कधीतरी)
तर पुन्हा मूळ विषयाकडे,
साधारणतः एक पुरवठादार कंपनी सुरू होते तेव्हा त्यासाठीही पुन्हा छोटे छोटे व्यवसाय सुरू होतात. यामध्ये अगदी टूल सप्लायर, ग्रीस, बेल्ट, स्क्रॅप, मशीनचे सुटे भाग विक्रेते त्यासोबतच हंगामी कामगार पुरवणारे, केटरींग, शिंपी, मालाची वाहतूक करण्यासाठी चे वाहन पुरवठादार इत्यादी अनेक व्यवसाय सुरू होतात.
तसेच घरांची , शाळा, उद्यान इत्यादींची गरज निर्माण होऊन तो एक व्यवसाय सुरू होतो.
यासोबतच गॅरेज, पंक्चर, चहा, नाश्ता देणारे छोटे मोठे हॉटेल असा विविध प्रकारच्या व्यवसायांची निर्मिती होते.
एक उत्पादन साखळी अनेक उद्योगांना आणि रोजगार निर्मिती होनेसाठी अशा प्रकारे कारणीभूत ठरते.
त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्या गाडीला चावी लावाल तेव्हा तुम्ही किती लोकांच्या रोजगार निर्मितीसाठी कारणीभूत झालेला आहात याचा विचार करा आणि स्वतः च स्वतः ची पाठ थोपटायला विसरू नका.

© Sachin Kale 8 Sept 2018

No comments: