Monday 10 September 2018

सावध ऐका पुढल्या हाका #उद्योग ४.०



उत्पादन क्षेत्रामध्ये मोठे बदल घडत आहेत. उद्योग विश्वातील चौथी क्रांती ज्या वेगाने होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात उद्योग क्षेत्राची
घडीच बदलणार आहे.
उत्पादन प्रक्रियेमध्ये digitalization, connected shop floor च्या माध्यमातून होणाऱ्या कामामध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमी करण्याच्या दृष्टीने खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास आणि अमल बजावणी सुरू आहे. कामामध्ये येणाऱ्या अडचणी त्वरित संबंधितांकडे पोहचवणे यासाठीचे तंत्र विकसित करून अगदी तुमच्या हातामधील मोबाईल स्क्रीन वर सद्य परिस्थिती काय आहे, हे दिसणे ही एक फारच सामान्य बाब झाली आहे.
Industry 4.0
द्वारे सॉफ्टवेअर चा अधिकाधिक वापर आणि त्याद्वारे स्वतः ची अडचण स्वतः च ठीक करणारी मशीन आपल्या कारखान्यामध्ये असणे आता फार दूरची गोष्ट नाही...

उद्योग१.०
१८०० मध्ये वाफेच्या शक्तीच्या शोधा मुळे उद्योगा मध्ये पहिली क्रांती घडवून आणली. जे व्यवसाय कौटुंबिक अथवा मित्रांच्या सहकार्याने छोट्या प्रमाणात चालायचे त्यांचे रूपांतर कारखान्यामध्ये व्हायला लागले. पण वाफ निर्मितीसाठी लागणारे पाणी, कोळसा आणि एकंदरच अवघड व्यवस्था यामुळे मर्यादित उत्पादन ही एक अडचण होती. खुपमोठा पसारा असल्याने मशीन ही एकाच ठिकाणी असणे, उत्पादन प्रक्रिया सुटसुटीत आणि लवचिकता नसणे ह्या वाफेच्या वापराच्या मर्यादा होत्या.
पण यामुळेच खूप जणांना रोजगार मिळाला आणि शेती ऐवजी अजून एक क्षेत्र खुले झाले.

No comments: