साधारण एकवीस वर्षांपूर्वी जेव्हा शिकवू उमेदवार म्हणून लागलो होतो तेव्हा फाईल उडायच्या.
म्हणजे असं व्हायचं की रात्री उशिरा घरी जाण्यापूर्वी जो रिव्ह्यू व्हायचा त्यामध्ये कधी कधी फाईल आणि कागद अक्षरशः उडायचे
मग आम्ही सगळे ते गोळा करायला धावायचो.
साधारण सुरुवातीला तीन महिने अशा फाईल आणि कागद उडाले.
ते उडालेले कागद पकडून पकडून पुन्हा पुन्हा त्यामध्ये सुधारणा करून झाल्यावर पाठीवर थाप पडायला लागली.
असे चांगले व्यवस्थापक भेटले त्यामुळे आम्ही बिघडलो आणि घडलो.
अर्थात आता वातावरण बदलले आहे.
पण त्या सुरुवातीच्या आमच्या मास्तरांविषयी कृतज्ञताच मनामध्ये आहे.
सचिन काळे ©️
No comments:
Post a Comment