कौशल्यावर काम करा उत्पादकता नक्कीच वाढेल.
या वाक्याने आपल्या भाषणाचा समारोप करत बिझनेस हेड यांनी कौशल्य सेंटर ची फित कापली. तसा टाळ्यांचा कडकडाट झाला.
तर त्याच अस झालं की त्या प्लांट ने नफा कमवायला सुरुवात केली. त्यामागे परिश्रम होते. वेस्ट म्हणजे अपव्यय कमी करण्यात आले. उत्पादकता वाढली. गुणवत्ता सुधारल्याने व्यय कमी होऊन वेळेवर माल ग्राहकाला मिळू लागला.
हे सर्व बदल होण्यामागे कंपनी ने अंगीकारलेले टी पी एम चे तंत्र जसे कारणीभूत होते तसेच कामगार अधिकारी आणि व्यवस्थापक या सर्वांचाच सहभाग याचा मोठा वाटा होता.
पूर्वी म्हणजे उदारकिरण होण्याआधी साधारण पणे नफा मिळवण्याचे गणित असे होते
विक्री किंमत = नफा + खर्च
यामध्ये सरंक्षित परमिट आधारित व्यवस्था जशी होती तशीच ग्राहकांना निवडीला मर्यादित वाव होता.
परंतु उदारीकरणानंतर हे चित्र बदलले. मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेत. याचा परिणाम गुणवत्ता उंचावणे आणि किंमत स्थिर ठेवणे ही तारेवरची कसरत सुरू झाली.
आता नफा साठीचे सूत्र अशा प्रकारे बदलले
नफा = विक्री किंमत - खर्च
नफा अधिक वाढवायचा असेल तर किंमत वाढू न देता खर्च कमी करायला पाहिजे.
येथेच अपव्यय कमी करून उत्पादन खर्च कमी करता येईल. त्यासाठी उत्पादकता, गुणवत्ता वाढवणे आणि वेळेवर मालाचा पुरवठा ग्राहकाला करणे याने ते साध्य होईल.
तर मूळ गोष्टीवर येऊ. या कंपनीने मिळवलेला नफा.
या प्लांट हेड चे धोरण होते की जसे आपण शॉप फ्लोअर वर सुधारणा करत आहोत त्याच पद्धतीने लोकांच्या कौशल्यामध्ये देखील सुधारणा करायला हवी. त्यासाठी प्लांट टीम सोबत चर्चा करून एका ट्रेनिंग सेंटरचा आराखडा बनवून घेतला होता.
पण त्यासाठी असणारा क्ष रुपयांचा खर्च हा एक मोठाच यक्ष प्रश्न होता.
तोच मुद्दा त्यांनी मासिक बैठकीमध्ये सहकाऱ्यांसमोर मांडला होता. त्यावर अनेक सूचना आल्या. अपव्यय कुठे कुठे आहेत. ते कमी कसे करायचे, त्यासाठी सर्वांचे सहकार्य कशा पद्धतीने घ्यायचे याची सांगोपांग चर्चा होऊन त्याची एक योजना बनवण्यात आली.
पुढील तीन महिने त्या सर्वांनी त्या योजनेवर कार्यवाही केली आणि लॉस मध्ये असणारा प्लांट नफ्यात आणला. हे फारच सोपे करून लिहिले गेले आहे 😀 त्यामध्ये असलेल्या बऱ्याच किचकट गोष्टीवर या टीमने मेहनत घेतली.
त्यानंतरचे कार्य म्हणजे कौशल्य सेंटर उभारणे आणि ते सुरू कारणे हे त्यामानाने सोपेच होते.
आज त्या प्लांट मध्ये सर्वच कामगार, कनिष्ठ अधिकारी कौशल्य सेंटर मध्ये शिक्षित झाले आहेत. त्याचा एक कंपनीसाठी जसा हवा तसा अभ्यासक्रम आहे. आणि अर्थातच त्याचा फायदा जसा कंपनीला होतो तसाच तो सर्वांना होतो कारण कौशल्य वाढीने केवळ उत्पादकता नाही तर कामगार आणि अधिकाऱ्यांची व्हॅल्यू देखील वाढते.
येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये कुठल्या व्हॅल्यू आपण वाढवायच्या यासाठी नवीन ज्ञान आणि कौशल्य काय मिळवायचे याची तुमची यादी तयार असेलच.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
चिअर्स...
सचिन काळे ©️
No comments:
Post a Comment