एका पावडर कोटिंग शॉप मध्ये आग लागलेली. फार मोठी नाही नियंत्रणात होती.
खर म्हणजे पेंट शॉप, पावडर शॉप अथवा कुठल्याही प्रोसेस इंडस्ट्री मधील आग ही फार धोकादायक.
लवकर आटोक्यात येणं मुश्किल.
तर ही जी आग लागलेली ती एका छोट्या एरियात होती. अशा वेळेस करावयाची कार्यवाही ठरलेली असते.
आगीचा इशारा देणारा भोंगा वाजू लागल्यानंतर सर्वात प्रथम तिथून बाहेर पडणे आणि स्वतःची काळजी घेणे तसेच सेफ झोन मध्ये जाऊन उभे राहणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य असते.
त्याच वेळेस फर्स्ट एड ची एक टीम असते ती कुणी जखमी झालेला असेल तर त्याला तिथून बाहेर काढते.
तसेच फायर फायटरचा चमू असतो जो यावेळेस आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतो. अर्थात छोट्या प्रमाणावर जर आग असेल तरच. त्यासोबतच बहुतांश आस्थापनांमध्ये ऑटो स्प्रिंकलर्स हे लावलेले असतात.
परंतु केमिकल, पेंट सारख्या पदार्थाला जर आग लागली तर त्या ठिकाणी व्यावसायिक अग्नि शामक दलच कामाला येते. बहुतांश मोठ्या कंपन्यांमध्ये स्वतःचे अग्निशामक दल असते.
त्यासाठीचे ड्रिल एका ठराविक कालावधीनंतर आस्थापनांमध्ये होत असतात आणि त्यामध्ये सर्वांचा सुरक्षित बाहेर पडण्यासाठीचा लागणारा वेळ नोंदवला जात असतो. आणि अर्थातच काय सुधारणा करणे गरजेचे आहे तेही नोंदवला जातो.
तर परत एकदा या पावडर कोटींग शॉप च्या आगी बद्दल. आग चटकन आटोक्यात आली आणि सुरक्षित जागी जमा झालेल्या सर्वांची मोजणी झाली लक्षात आले की चार जण सापडत नाहीयेत.
तितक्यात फर्स्ट एड करणारी टीम त्या चौघांना धरून बाहेर घेऊन येत होती. झालं असं की आग लागली कळल्यावर हे चार उत्साही विर मिळेल ते फायर extinguishar घेऊन तिकडे गेले आणि त्यांनी फायर extinguishar चा नेम (म्हणजे जिथून आग नियंत्रित आणणारी पावडर बाहेर पडतो तो पाइप) स्वतः कडे (चुकून) ठेऊन कॉक सुरू केला.
पावडर आगीवर जाण्याऐवजी तोंडावर आलेली. थोडे वैद्यकीय उपचार करून त्यांना घरी जाऊ दिले गेले.
दुसऱ्या दिवशी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचे सुरक्षा विषयक ट्रेनिंग घेण्यात आले.
सुरक्षा नेहमी स्वतः पासून.
जर आपण एखादे कार्य करण्यासाठी प्रमाणित नसू तर ते करू नये.
आपत्कालीन स्थितीमध्ये आधी स्वतः सुरक्षित व्हा नंतर मदतीचा विचार करा.
सचिन काळे ©️
No comments:
Post a Comment