एकदा एक ट्रेनिंग घेत होतो
समोर सगळे ऑपरेटर होते
जरा वातावरण निर्मिती व्हावी म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम याविषयी सांगायला सुरुवात केली.
ते करताना मोठा श्वास सगळ्यांना घ्यायला लावला आणि नंतर मी श्वास सोडा असं सांगायचं विसरलो
साधारण दीड मिनिटानंतर समोर बसलेला एक जण कसंतरीच करायला लागला नीट पाहिल्यावर लक्षात आलं की त्याने श्वास अजूनही आत मध्येच ठेवला आहे.
पटकन त्याला सांगितलं अरे श्वास सोड. त्यावर धाप लागल्यासारखा त्यांनी श्वास बाहेर काढला 😀.
कधी कधी फारच ऐकणारे विद्यार्थी मिळतात.
अर्थात पुढील सेशन्स मध्ये श्वास सोडा असं सांगायला पण सुरुवात केली हे सांगणे न लगे
No comments:
Post a Comment