Saturday, 11 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्ट १४

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्ट १४

पारदर्शक व्यवहार आणि सचोटी

एकदा काय झालं. असाच एक जण त्याला आपण ब म्हणू.
तर ब हे कंपनीच्या कामासाठी एका मोठ्या शहरात गेले. तिथेच त्यांना तीन दिवस थांबावं लागलं. काम आटोपल्यावर ते परत आले.
त्यानंतर त्यांनी त्या भेटीचा आणि कामाचा एक सविस्तर अहवाल बनवला आणि तो वरिष्ठांना पाठवून दिला.
त्यानंतर त्यांनी जे काही खर्च त्या प्रवासामध्ये आणि तिथे राहत असताना केले होते त्याचाही एक अहवाल बनवला आणी त्याला वेगवेगळे बिल लाऊन तोही पुढे पाठवला.
त्यामध्ये वेगवेगळे खर्च उदाहरणार्थ प्रवासाचे तिकीट, लॉज, जेवणे, इत्यादी माहिती देण्यात आलेली होती.
बरेचदा अशा वेळेस कंपनी आधी उचल पैसे पण देते. त्याचाही हिशेब या अहवालामध्ये द्यावा लागतो.

तर ब ने हा खर्चाचा अहवाल मान्यतेसाठी पाठवल्यानंतर तिसरे दिवशी त्यांना एचआर विभागांमधील अधिकाऱ्यांनी बोलावले आणि त्यांच्या हाती सेवा समाप्त केल्याचे पत्र ठेवले तसेच त्यांना राजीनामा देउन जाऊ शकता असा हि प्रस्ताव दिला. जो ब ने स्वीकारला.

तर असे काय घडले होते. की ब ला संस्थेबाहेर पडावे लागले.
झालं असं होत की ब यांनी जे बिल लावले होते त्यामध्ये काही खोटे बिल पण होते. आणि ते अर्थातच कंपनीच्या लक्षात आले.

पारदर्शकता, सचोटी ही मूल्ये कालातीत आहेत.

- सचिन काळे ©️

No comments: