JIPM द्वारे कारखान्याचे सुधारणा कोणत्या पातळीवर आहेत याचे म्हणजेच उत्कृष्टतेचे मूल्यमापन केले जाते.
हे मूल्यमापन करायला येणारे JIPM तर्फे दोन प्रतिनिधी असतात. त्यातील एक हे JIPM चेच वरिष्ठ कौन्सेलर असतात तर दुसरे हे औद्योगिक अथवा अभियांत्रिकी कॉलेजेस मध्ये शिकवणारे प्राध्यापक असतात त्यांच्याकडे इंडस्ट्री आणि कॉलेजेस युनिव्हर्सिटी यांचे खूपच छान द्वैत आहे. जे आपल्याकडे सुधारणेस भरपूर वाव आहे.
आम्ही आत्तापर्यंत ज्यांच्यासोबत काम केले त्या कौन्सेलर चे वय 72 पासून 79 वर्षे पर्यंत होते.
एकदा त्यांना सोडण्यासाठी मी जेव्हा दिल्ली येथील विमानतळावर गेलो होतो तेव्हा त्यांच्या चालण्याचा वेग साधण्यासाठी मला पळावे लागले होते.
ह्या वयातही अतिशय फिट, जेवणामध्ये मिताहारी म्हणजे एक / दोन मूठभर भात, सलाड आणि ज्यूस असे.
असेसमेंट सकाळी साडे आठ वाजता सुरू होते ते सायंकाळी पाच पर्यंत किंवा कधी कधी सात वाजेपर्यंत देखील चालते. यामध्ये आपल्याकडील ट्रॅफिकचा वेळ धरला नाहीय.
पूर्ण वेळ ताठ बसत एकाग्रतेने टीम ने केलेल्या सुधारण प्रेझेंटेशन द्वारे अथवा शॉप फ्लोअर वर मॉडेल आधारे बघत आणि दुभाष्याद्वारे सांगितली गेलेल्या गोष्टी एकत तसेच त्यावर सुधारणा सांगत असेसमेंट चालते. संध्याकाळी कारखाना उत्कृष्टतेच्या कोणत्या पातळीवर आहे तसेच पुढच्या पातळीवर जाण्यासाठीचा सुधारणा सांगितल्या जातात. त्याला गृहपाठ दिला असे म्हणतात. त्यावर कार्यवाही करून सहा महिन्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या असेसमेंट मध्ये दाखवायचे असते.
या सर्वामध्ये वाखाणण्याजोगे म्हणजे त्यांचे अलर्ट रहाणे.
अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की यांचा भाषा अभिमान. जरी त्यांना इंग्रजी समजत असेल तरी देखील दुभाष्या द्वारेच संवाद साधल्या जातो.
ह्या असेसमेंट चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी मिनिटं मिनिटाचा हिशोब ठेऊन कार्यक्रम पत्रिका बनवावी लागते आणि ती साध्य करण्यासाठी सर्वांनाच चांगलेच पळावे आणि पळवावे लागते.
त्याठिकाणी आपला ist काही कामाचा नाही 😀.
ह्या असेसमेंट मध्ये सहभागी झालेल्यांना एक वेगळा खूप शिकवून जाणारा अनुभव निश्चितच मिळतो.
ता. क. जपान मध्ये तरुण मंडळी इंग्रजी साठी गुगल ट्रान्सलेट ह्या अँप ह्या चांगला उपयोग करताना दिसली.
JIPM जपान इन्स्टिट ऑफ प्लांट मेंटेनन्स - जगभर टी पी एम साठी प्रोत्साहन आणि शिकवणी देणारी संस्था.
टी पी एम TOTAL PRODUCTIVE MAINTENANCE - उत्कृष्टतेकडे नेण्यासाठीची प्रणाली.
#TPM
#EXCELLENCE
सचिन काळे ©️
No comments:
Post a Comment