रात्री दोन अडीच वाजेपर्यंत. तीन चार वेळा मागच्या चार दिवसापासून गुजरातमधून आलेला व्हॅक्यूम ओवेन आणि त्याची बसवायची जागा यांची माप घेऊन झाली होती.
प्रोजेक्ट मॅनेजर च्या ऑफिस मध्ये सर्वत्र ड्रॉइंग चे भेंडोळे, रिकाम्या कॉफीचे कप आणि कागदाचे बोळे ओसंडून वाहणारी डस्टबीन इकडे तिकडे पडलेल्या खुर्च्या आणि त्यासोबत सुन्न होऊन बसलेला प्रोजेक्ट मॅनेजर. मोबाईलवर घरून आलेले चार सहा मिस् कॉल.
दूरवरच्या कंपनीमध्ये पडणारे रात्री तीन चे टोले सुस्पष्ट एकु येत होते. खालच्या शॉप मध्ये रात्रपाळीच्या कामगारांचा आणि मशीनचा तसेच व्हॅक्युम ओवेन चा हमम् असा आवाज त्यासोबतच रात किड्यांची किर किर याने एक गूढ माहोल बनला होता. नुकताच पावसाळा सुरू होत असल्याने वातावरणात एक उष्मा भरून राहिलेला.
थोड्याच वेळापूर्वी घरी निघालेले मेंटेनन्स हेड आणि कन्सल्टंट एकाच गाडीमधून गेलेले त्याचाही पुसटसा आवाज आता एकु येईनासा झालेला.
हा ओवेन जागेवर बसणं आणि वेळेत सुरू होणे हा खर तर एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आता झाला होता.
आठ महिन्यांपूर्वी झालेल्या कॅपेक्स मीटिंग मध्ये बिझनेस हेड यांनी एका नव्या जागेची मागणी apex कमिटिकडे केली होती. वाढलेल्या आणि येनाऱ्या ऑर्डर साठी एक नवे शॉप मागितले होते. त्यावर भरपूर चर्चा होऊन सध्या आहे त्या कपॅसिटी चे मूल्यमापन करा व काय करता येऊ शकते ते शोधा यासाठी एक सीएफटी बनवण्यात आली. त्याचा प्रमुख म्हणून आपल्या प्रोजेक्ट मॅनेजर ची निवड करण्यात आली.
पुढचा महिनाभर त्या टीमने खूपच चांगल काम केलेले. Value stream mapping, man machine utilisation, standard work combination table, space utilisation यासोबतच takt time म्हणजे उपलब्ध वेळ आणि ग्राहकांच्या ऑर्डर यांचा ratio असा सर्व सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यात आढळले की सध्या असणारा ओवेन हा bottleneck आहे.म्हणजे तोच उत्पादन किती असावं हे ठरवतो. हे म्हणजे अस आहे की समजा तुम्ही निगडी वरून चाकण ला प्रवास करता आहात चांगला चौपद्री रस्ता आहे. मग पुढे गेल्यावर एक वळण येत आणि इतका वेळ ६० किमी च्या वेगाने जाणारी गाडी एकदम २-५ किमीच्या वेगाने रांगु लागते ते वळण म्हणजे bottleneck असो.
तर त्यावर उपाय म्हणून ओवेनची क्षमता वाढवणे आणि नवा ओवेन आणणे. याने पुढच्या चार वर्षांच्या ऑर्डरची पूर्तता होणार होती तेही नवीन शॉप न टाकता.
त्यानंतर बराच तांत्रिक उहापोह झाला. अनेक रिव्ह्यूज आणि कॉफीचे कप देखील रिकामे झाले. शेवटी शॉप मधली एक जागा निश्चित करण्यात आली त्यासोबतच नव्या ओवन ची ऑर्डर देखील केली गेली.
त्या आठ महिन्याच्या मेहनतीचा परिणाम म्हणून चार दिवसापूर्वी नवा ओवन आला होता
आणि त्याला बसवताना ठरल्याप्रमाणे ठरल्या जागी ठेवायचं ठरल्यावर लक्षात आलं की ओवेनची उंची आणि शॉप ची उंची यामध्ये तफावत होती. खरंतर असं व्हायला नको होतं पण सर्वच ठीक होईल तर तो प्रोजेक्ट कसला. ही तफावत चांगलीच अर्धा मीटरची होती.
सर्वांचेच विचार करून करून डोके शिणले होते आणि आता रात्री तीन वाजता एकटा प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट ऑफिस मध्ये थांबलेला होता. शेवटी चार साडेचार वाजता त्याचा डोळा लागला. गेले दोन-तीन दिवस तो ऑफिसमध्येच मुक्कामाला होता.
सकाळी सात वाजता पहिली पाळी चालू होण्याचा भोंगा वाजला तरी प्रोजेक्ट मॅनेजर खुर्चीवर बसून आणि टेबलावर डोके टेकून झोपलेला होता.
आठ वाजता कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला म्हणून त्याला जाग आली. डोकं वर उचलून बघितलं तर अस्पष्ट असा कॉफीचा कप धरलेला एक हात त्याच्यासमोर आलेला. त्याने डोळे वर करून बघितलं पण अस्पष्टच दिसलं. ब्लॅक कॉफीचा अरोमा तोपर्यंत त्याचा नाका मधून मेंदूच्या योग्य जागी पोहोचला होता. डोळे चोळत त्याने इतरत्र हात फिरवला आणि बाजूला ठेवलेला चष्मा उचलून डोळ्यावर ठेवला. बघतो तर बिझनेस हेड बाजूला उभे होते. कंपनीच्या कामासाठी मागच्या आठवड्यात मुंबईला गेलेले आणि तिकडेच असलेले आज सकाळी सकाळी थेट कंपनीत आलेले बिजनेस हेड त्याच्याकडे बघून हसत होते.
चल काय झालं बघूया. असं म्हणत त्यांनी परत एकदा त्याचा खांदा थोपटलां. जरी ते ऑफिसच्या बाहेर मागचे काही दिवस असले तरी इथे काय चाललेलं होतं याची उत्तम बातमी त्यांना असलेली दिसली. त्याच्या हातात कॉफीचा कप टेकवून ते ड्रॉइंग बोर्ड जवळ गेले. घारीसारख्या नजरेने डोळे बारीक करत ते तिथे बघू लागले. कॉफीचे घोट घेत उठून उभा राहा प्रोजेक्ट मॅनेजरने बिजनेस हेडकडे दुरून बघितलं. खिडकीतून येणारा सूर्याचा प्रकाश बिझनेस हेडच्या चंदेरी केसांवर सोनेरी झाक दाखवत होता. त्यासोबतच सोनेरी काड्याचा चष्मा देखील चमकत होता. क्षणभर तो क्षण थांबलेला आहे आणि आपण युगा युगांपासून असेच कॉफीचा कप घेऊन उभे आहोत असं काहीतरी फिलिंग प्रोजेक्ट मॅनेजरला आलं.
पाच सात मिनिटे त्या ड्रॉइंग कडे बघितल्यानंतर ठेवणीतले हसू चेहऱ्यावर खेळवत बिझनेस हेडणे मीश्किल डोळ्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर कडे नजर रोखली.
प्रोजेक्ट मॅनेजर ला खूप काही सांगायचं होतं पण शब्द हरवले होते. त्याला खुणेने जवळ बोलवत बिझनेस हेडने एका विशिष्ट ठिकाणी बोट टेकवले. जर तू वर जाऊ शकत नसशील तर खाली जा बघ अगदी सोपं आहे. हे शब्द ऐकल्यावर प्रोजेक्ट मॅनेजरने चष्मा नाकावर ठीक करत परत एकदा त्या ड्रॉइंग्स कडे नजर टाकली. युरेका का काय म्हणतात तो क्षण त्याला सापडला. कॉफीचा कप बाजूला ठेवत त्याने दोन्ही हातांनी बिजनेस हेडचे हात घट्ट पकडले. या कानापासून त्या कानापर्यंत हसत थँक्यू सर असं म्हणत दोनदा तीनदा त्यांचा हात त्यांनी हलवला.
चल कामाला लाग मला तो बीस्ट लवकर चालू झालेला पाहिजे. असं म्हणत बिझनेस हेड त्याला ड्रॉइंग बोर्ड जवळ सोडून निघून गेले.
प्रोजेक्ट मॅनेजरने पटकन फोन हाती घेतला मेंटेनन्स हेड आणि प्रोजेक्ट कन्सल्टंट या दोघांनाही फोन लावला सोबतच प्रोजेक्ट टीमलाही लावला.
पुढच्या तासाभरात सर्व टीम प्रोजेक्ट ऑफिस मध्ये जमा झाले. तोपर्यंत काय करायचं याचा आराखडा प्रोजेक्ट मॅनेजरने तयार करून ठेवलेला.
त्यादरम्यान मेंटेनन्स हेडणे सिव्हिल ची टीम बोलावलेली. आणि संडे क्रेन सर्विस पण.
पुढचं काम तितकं अवघड नव्हतं सर्व प्रोफेशनल टीमने एकत्र देऊन पुढच्या 24 तासांमध्ये तो ओवेन जागेवर बसवला. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट चटचट सर्व कनेक्शन्स केले. 24 तास त्या ओहनला सुरू करून अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आले. सर्व पॅरामीटर दोनदा दोनदा चेक करण्यात आले. एकदा प्रोजेक्ट कॉलिटीने हिरवा झेंडा दाखवल्यावर पुढच्याच दिवशी बिझनेस हेड यांनी नव्या ओवन ची लाल फित कापली. आणि नारळ वाढवून पहिला पेढा प्रोजेक्ट मॅनेजरला भरवला.
टाळ्यांच्या कडकडात प्रोजेक्ट मॅनेजरला दोन दिवसा मागचा सकाळचा तो मिश्किल हसरा चेहरा आठवत होता.
शेवटी अनुभवच कामाला आला होता.
सचिन काळे ©️
2 comments:
Inspiring and wonderful sachin ! I like the definition of bottleneck. story telling is an art and you converted fact into nice inspiring experience ! Proud of you man, cheers
Sir thank you for inspiring words
Cheers
Post a Comment