Monday 10 September 2018

थेंबे थेंबे तळे साचे



कुठल्याही मोठ्या कामामध्ये त्यात सहभागी असलेल्या शेवटच्या माणसाला आपली जबाबदारी पूर्ण करायची संधी मिळाली तर मोठ मोठाली कामेही सुरळीत पार पडतात . मिळालेलया यशामध्ये माझाही खारीचा वाटा आहे,  यामुळे एक अभिमानाची भावना निर्माण होते त्याचे मोल पैशामध्ये करता येणे अशक्य आहे.
आणि याच भावने मुळे भविष्यातही मिळवलेले यश टिकवणे शक्य होते.

१. 


त्याची सुरवात २३ सप्टेंबर २००८ मध्ये झाली.  औरंगाबाद पासून  १६०० कि मी अंतरावरील पं . बंगाल मधील सिंगूर येथील नॅनो कार चा प्रकल्प टाटांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. टाटांच्या सोबत सुटे भाग पुरवठादार असलेल्या औरंगाबाद मधील कंपनींचीही गुंतवणूक सिंगूर येथे झालेली होती. आधीच मरगळलेल्या औरंगाबाद मधील वाहन उद्योगावर या घटनेने अजूनच वाईट परिणाम होणार हे स्पष्ट दिसत होत.

यानंतर कंपनी च्या मुख्यालयात बैठकी वर  बैठकीचा सपाटा  चालू झाला. अशाच एका बैठकी मध्ये साहेब आणि मी हजेरी लावून आलो. कंपनीच्या मुख्य अधिकाऱयांनी स्पष्ट शब्दात सांगितले आलेल्या संकटावर मात करायची आहे आणि त्यासाठी  सर्वच युनिट नि आपला उत्पादन खर्च नियंत्रित करणे आवश्यक आहे. ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीमध्ये कंपनी पुढे असलेले आव्हान आणि आपण काय करायला हवे याचे स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले.

साहेब आणि मी कार ने परतत असतांना त्याच विषयी चर्चा झाली. "सचिन एक शॉप फ्लोअर  मीटिंग बोलाव मला सर्वच विभाग प्रमुख , कामगार (स्थायी आणि अस्थायी) उपस्थित असायला हवे.  यातून बाहेर पाडण्यासाठी सर्वाना यात सामील कारण आवश्यक आहे ". कंपनीच्या पार्किंग मध्ये कार मधून उतरत असताना साहेबानी मला सांगितले.

दुपारी दोन वाजता शॉप फ्लॉवर वर जाण्यापूर्वी त्यांनी मागितलेला अहवाल मी त्यांच्या हाती दिला. त्यावर एक नजर टाकून ते थोडेसे हसून म्हणाले "मस्त !!!  चल जाऊया आता सर्व जण आलेत ना?" 
"हो तर" इति मी.
  
मशिन शॉप च्या बाजूला असलेल्या मोठया जागे मध्ये सर्व जण जमलेले होते. खाली टाकलेल्या चटई वर व्यवस्थित रंगे मध्ये सर्व जण बसलेले होते, विभाग प्रमुख आणि शिफ्ट सुपरवायझर बाजूने उभे होते. आम्ही तिथे पोहचलो. साहेबानी एक नजर सर्वांवर टाकली आणि ध्वनिक्षेपक हातामध्ये घेतला. थोडास घसा  खाकरून त्यांनी बोलायला सुरवात केली. "मित्रानो आपण सर्व जण इथे एका महत्वाच्या विषयावर माहिती घेण्यासाठी जमलेलो  आहोत... " पुढचे काही मिनिटे त्यांनी सद्य परिस्थिती आणि कंपनी समोर असलेल्या आव्हानांविषयी सर्वाना अवगत केले... " या सर्व गोष्टीमुळे आपल्याला आपले सर्व खर्च उदाहरणार्थ वीज , कच्चा  माल, टूल, ऑइल कूलंट यांच्या अपव्यय नियंत्रित करायचा आहे यामुळे आपला  उत्पादन खर्च कमी होईल.  तसेच अनुत्पादक खर्च देखील कमी  करायचा आहे..." यासंदभात एका टीम चीही त्यांनी घोषणा केली.

 पुढच्या  तीन महिन्यात  थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा अनुभव आम्ही सर्व घेणार होतो... 

क्रमशः 
भाग १/५

© सचिन काळे 

No comments: