Sunday 17 April 2011

TPM चा इतिहास .

TPM चा इतिहास .
TPM  या संकल्पनेचा विकास जपान मध्ये झाला.
  • BREAKDOWN MAINTENANCE - साधारण १९५०  पर्यंत औद्योगिक क्षेत्रामध्ये यंत्र बंद पडल्यावरच त्याची दुरुस्ती केली जायची म्हणजे आपण यंत्र बंद पडायची वाट पाहतो व ते होताच दुरुस्ती करतो. या प्रकार मध्ये आपण यंत्र बंद पडू नये म्हणून आपण विशेष काम करीत नाही व त्यामुळेच यंत्रे बंद पडण्याचे प्रमाण कमी होत नाही.
१९५१ साली यंत्रामध्ये बिघाड होऊ नये यासाठी यंत्राची काळजी  (PREVENTIVE  MAINTENANCE)
ची सुरवात झाली अर्थात हि संकल्पना अमेरिकेकडून घेण्यात आली होती. निप्पोनडेन्सो या टोयोटा समूहामधील कंपनीमध्ये सर्वप्रथम बिघाड प्रतिबंधक निगा (PREVENTIVE  MAINTENANCE) ची सुरवात झाली.

  • बिघाड प्रतिबंधक निगा (PREVENTIVE  MAINTENANCE) या पद्धतीमध्ये उत्पादन   विभागातील कामगार उत्पादन करतात आणि मेंटेनन्स  विभागातील कामगार यंत्राची काळजी घेतात परंतु निप्पोनडेन्सो मध्ये मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित यंत्रे असल्याने, काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्य बळाची  गरज मेंटेनन्स  विभागात भासू लागली. यामुळेच निप्पोनडेन्सो च्या व्यवस्थापनाने ठरवले कि उत्पादन विभागातील कामगार आपापल्या यंत्राची काळजी घेतील (यालाच स्वयं देखभाल असे म्हणतात ) आणि  मेंटेनन्स  विभागातील कामगार ज्या ठिकाणी मोठ्या कौशल्याची गरज आहे अशा प्रकारची कामे करतील. अशा प्रकारे   निप्पोनडेन्सोने जिथे Priventiv maintenance करीत असतानाच स्वयं देखभाल अर्थात Autonomous  Maintenance सुरु केले.उत्पादन विभागातील कामगार आपल्या यंत्राची काळजी घेऊ लागल्यामुळे  मेंटेनन्स  विभागातील कामगार यंत्राच्य सुधारणेवर जास्त लक्ष देऊ लागले आणि या सुधारणा नवीन येणाऱ्या यांत्रावारही राबवल्या  जाऊ लागल्या याचा परिणाम बिघाड होण्यास प्रतिबंद (Maintenance Prevention )होण्यात झाला.
  • १९७१ याच preventive maintenance आणि Maintenance Prevention च्या संयोगातून Total  Productive Maintenance (संपूर्ण उत्पादनक्षम देखभाल)चा  उगम  झाला .उत्पादनक्षम देखभालीचे ध्येय  प्रकल्प व सयंत्राची परिणामकारकता वाढवणे हे आहे.
  • यानंतर निप्पोनडेन्सो ने गुणवत्ता गट  स्थापन केले आणि कामगार व कर्मचारी यांचा सहभाग गुणवत्ता वाढीसाठी केला. आणि सर्व कामगारांच्या सहभागातून संपूर्ण उत्पादनक्षम देखभाल सुरु केली. त्यांच्या या कार्यासाठी JIPM (Japan Institute of Plant Maintenance)या संस्थेने TPM राबवण्यास्ठी व विकसित करण्यासाठी विशेष पारितोषिक देऊन गौरविले. अशारितीने निप्पोनडेन्सो हि TPM प्रमाणपत्र मिळवणारी पहिले कंपनी ठरली.
  •  JIPM (Japan Institute of Plant Maintenance) हि संस्था विविध देशातील औद्योगिक क्षेत्रामध्ये TPM राबवण्यासाठी मार्गदर्शन करते तसेच टि पी एम मध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कंपनीस या संस्थे तर्फे विशेष पारितोषिक दिले जाते.
  • भारतामध्ये JIPM आणि CII ( Confederation of Indian Industries) यांच्या सहकार्यातून  TPM Club Of India हि संस्था TPM बद्दलचे मार्गदशन भारतातील कंपन्यांना करते. 
  • भारतामध्ये १९९५ साली सर्वप्रथम विक्रम सिमेंट्स या कंपनीला टि पी एम पारितोषिक मिळाले.

Monday 14 March 2011

टी.पी.एम. म्हणजे काय?

  टी.पी.एम. म्हणजे काय?

संपूर्ण उत्पादनक्षम देखभाल अर्थात Total Productive Maintenance म्हणजेच उत्पादनासाठी  आपण जी सामुग्री ( वेगवेगळे यंत्र ) वापरतो त्यांची संपूर्ण देखभाल व ती कायम उत्पादनासाठी तयारीत असतील याची घेतलेली काळजी होय.
आजच्या स्पर्धेच्या व कमी किमती मध्ये अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादने उत्पादित करण्याच्या युगामध्ये आपल्या कारखान्यामधील यंत्रे (Machines) ही बिघाड रहित व कायम सुरु असण्याच्या स्थितीत असावीत हे एक मोठे आव्हान सर्वच उत्पादकांन समोर आहे. 
या आव्हानांचा सामना करण्यासाठी  Total Productive Maintenance हे एक महत्वाचे सूत्र आहे.


 टी.पी.एम. चे ध्येय: 


टी.पी.एम. चे ध्येय पाहिले असता  ते  श्युन्य बिघाड (Breakdown), श्युन्य अपघात (Accident) श्युन्य (गुणवत्तेतील) दोष (Defect) हे साध्य करणे होय (ZERO BAD).
हे साध्य करण्यासाठी टी.पी.एम. प्रणाली मध्ये खूप खोलवर विचार करण्यात आलेला आहे.

त्याबाबत आपण पुढील प्रकारे सविस्तर जाणून घेऊ. 
१.टी.पी.एम. चा इतिहास 
२.पाच एस
३.टी.पी.एम.अंमलबजावणीच्या बारा पायऱ्या .
४.टी.पी.एम.चे  आठ  आधारस्तंभ.
५.सोळा अपव्यय (16 LOSSES)
अपूर्ण: