Tuesday 17 October 2017

know "One point lesson"

प्रत्यक्ष कार्यस्थळी काम करीत असताना प्रशिक्षणासाठी "ONE POINT LESSON" अर्थात "एक वाक्यातील धडा " हे अतिशय सोपे तसेच उपयुक्त असे माध्यम आहे.

आज आपण याविषयी जाणून घेऊ.

एके दिवशी मशीनवरील नेहमीचा ऑपरेटर सुटीवर असल्याने नव्याने रुजू झालेला ऑपरेटर ला त्या ठिकाणी काम करण्यास सांगण्यात आले. या मशीनवर ब्रेझिंग ही केले जात असे. कामास सुरवात झाल्यावर थोड्याच वेळात ब्रेझिंग टॉर्च जळाली आणि मशीन नादुरुस्त (Breakdown) झाली. असे का घडले ?

जेव्हा या नादुरुस्तीचे विश्लेषण करण्यात आले असता निदर्शनास आले की मशीन सुरू केल्यानंतर ब्रेझिंग टॉर्चला थंड पाण्याचा पुरवठा करणारी झडप बंद होती. ब्रेझिंग सुरू करण्यापूर्वी पाणी पुरवठा सुरू असायला हवा होता.

या ठिकाणी "ONE POINT LESSON" हे अतिशय उपयुक्त ठरले असते. त्याठिकाणी काम करण्यासाठी आलेल्या ऑपरेटर ला जर कार्य करताना काय खबदारी घ्यायची आहे हे जर आधीच माहिती असते तर ही नादुरुस्ती आणि वेळेचा अपव्यय वाचू शकला असता.

खाली दिल्याप्रमाणे "ONE POINT LESSON" चा वापर करता येईल.

१. योग्य काय आहे ते चित्र स्वरूपामध्ये दाखवा.

२. अयोग्य काय आहे ते चित्र स्वरूपामध्ये दाखवा. - जर योग्य पद्धत अवलंबली नाही तर काय परिणाम होऊ शकेल उदा. बिघाड , गुणवत्ता दोष , अपघात याविषयी माहिती लिहा.


३. हे सर्व अगदी नेमके (थोडक्यात आणि मुद्देसूद) लिहिणे अपेक्षित आहे.